धनगर आरक्षणाला भाजप खासदाराचा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. आता पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्यावर कसलीच हालचाल झालीच नाही. तर आता भाजपच्याच खासदाराने त्याला विरोध दर्शविला आहे. सह्याद्री अतिथी गृहावर पार पडलेल्या बैठकीत दिंडोरीचे खासदार हरीशचंद्र चव्हाण यांनी धनगर आरक्षणाला विरोध दर्शविला आहे.

धनगर समाजाला सध्या व्हीजेएनटी प्रवर्गातून दिले जाणारे ३.५ टक्के आरक्षण हे वाढवून ७ ते ८ टक्क्यांवर न्यावे. परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या कोठ्यातून आरक्षण देऊ नये असे हरीशचंद्र चव्हाण म्हणाले आहेत. धनगरांना अनुसुचित जमातीच्या कोठ्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. कारण धनगर समाज अनुसूचित जमातीत मोडत नाही असे हरीशचंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

काँग्रेस आमदार के.सी पाडवी यांनी हि धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे. आदिवासी सल्लागार परिषदेशी विचारविमर्श नकरता आरक्षणाची शिफारस करणे योग्य आहे का. कायदेशीर आहे काय असे पाडवी यांनी म्हणले होते. मंत्रिमंडळात कोणत्याही पध्द्तीचा अहवाल सादर नकरता हे पाऊल उचलणे अयोग्य आहे असे पाडवी यांनी धनगर आरक्षणाच्या संदर्भाने म्हणले आहे.

आजपासून आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू, आरक्षणाचा सरकारी अध्यादेश जारी