अवघ्या दहा सेकंदात व्हाॅटस् अॅप हॅक करणारे अॅप दाखल

अाैरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन
तुमचा मोबाईल इतर कोणाच्या हातामध्ये अवघ्या दहा सेकंदासाठी ही देत असाल तो हॅक होऊ शकतो. तुमच्या मोबाईचे व्हाॅटस्अॅप वारंवार हॅंग होत असेल तर जरा काळजी घ्या कारण तुमच्या चॅटचा गैरवापर होऊ शकतो.आता तुम्ही म्हणाल हे का सांगताय ? अहो पण हे खरं आहे हो, कारण गुगल प्लेस्टोअरमध्ये व्हाॅटस्अॅप हॅक करणारे अॅप दाखल झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून अवघ्या काही वेळात आपल्या व्हाॅटस्अॅपचे सर्व मेसेज हॅक होऊ शकतात.आैरंगाबाद शहरात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हॅक करण्यासाठी हे अॅप मोबाईलवर घेतल्यानंतर यामध्ये एक क्यूआर कोड येतो. त्याचा वापर करुन ज्याचा मोबाईल हॅक करायचा आहे त्याच्या मोबाईलचा कोड स्कॅन करा. मग आपोआप दुसऱ्याचे व्हाॅटस्अॅप आपल्या मोबाईलवर चालू होतो.या अॅपच्या माध्यमातून इतरांच्या खासगी व्हॉटस अॅपवर पाळत ठेवली जाऊ शकते. व्हाॅटस्अॅप क्लोन प्रकारामुळे भविष्यात गुन्हेगारी वाढू नये यासाठी अाैरंगाबाद पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल इतरांच्या हातामध्ये देताना जरा विचार करा नाही तर तुमचा देखील मोबाईल हॅक होऊ शकतो.

व्हाॅटस्अॅप वापरणाऱ्यांनो जरा सावधान…