आयआरएस अधिकाऱ्याच्या गाडीने दोघांना उडवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आयआरएस अधिकारी शक्तीवेल राजू यांच्या गाडीने दोघांना उडवल्याची घटना घडली. यात दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय असून  एक जण गंभीर जखमी आहे.

मुंबईहून वाशीला जाताना मानखुर्दजवळ ही घटना घडली. शक्तीवेल राजू यांच्या गाडीने पांडुरंग कोकरे व अशोक भंडारी या दोघांना उडवले. या अपघातातील पांडुरंग कोकरे, अशोक भंडारी हे दोघे सकाळी फिरायला निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. यात पांडुरंग कोकरे मृत्यृमुखी  झाले असून अशोक भंडारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रक

याप्रकरणी मानखुर्द पोलीस गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपी शक्तिवेल राजू यांना अटक केली असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय येरनेकर यांनी दिली. आरोपी राजूला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तात्काळ जामीनदेखील मजुर  केला.