कोल्हापूरात भर उन्हाळ्यात गारांचा पाऊस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

दिवसभराच्या कडक उन्हानंतर गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर आणि परिसरात आवकाळी पाऊस झाला. पावसासह गारांचाही पाऊस पडल्याने नागरिकांसह बच्च कंपनीने याचा मनमुराद आनंद लुटला. भर उन्हाळ्यात गारांचा पडलेल्या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला.

मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. गुरुवारी दिवसभर यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. कोल्हापूरचे आजचे तापमान ३७.१ अंश सेल्सीअस नोंदवण्यात आले आहे. साधारपणे सायंकाळी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन गारांचा पाऊस पडला.
या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी आंब्यासह अन्य फळ पिकांचे नुकसान झाले आहे.