पेपरफुटीच्या चौकशीसाठी आणखी एक पथक

पुणेः पोलिसनामा ऑनलाईन
पहिल्याच दिवशी बारावीची इंग्रजी भाषेचा पेपर सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून, बारावी इंग्रजीचा पेपर सुरू होताच तासाभरातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या वसंत महाविद्यालयातून (तांबेवाडी) प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. त्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी गटशिक्षण विभागाने विभागीय मंडळाला तातडीने पाठवला होता. त्यानंतर आता राज्य मंडळाचे पथक त्या ठिकाणी भेट देऊन चौकशी करणार आहे.

इंग्रजीच्या पहिल्या पेपरला संपूर्ण राज्यात केवळ ६२ कॉपीचे गैरप्रकार नोंदविण्यात आले. राज्यभर मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असतानाही भरारी पथकांकडून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली जात नसल्याने खूप कमी गैरप्रकार उजेडात येत नाहीत.