बिटकॉइन फसवणूक प्रकरणी अमित भारद्वाजला पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बिटकॉइन फसवणूक  प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आणखी सहा आरोपींचा शोध घेत आहे.

हा प्रकार जुन २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान घडला. या प्रकरणातील दोन्ही आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकार वकील सुनील हांडे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, कंपनी सिंगापूरची आहे, आरोपींनी काही माहिती डिलीट केल्याचे समजते. त्यामुळे सर्व माहिती आणि लॉंग इन व पासवर्ड घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली.

बिटकॉईन फसवणूक प्रकरणात आतापर्यंत देशभरात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे निगडी व दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.