मद्यधुंद पोलीस व्हॅन चालकाने दिली सात ते आठ गाड्यांना धडक

कोंढवा: पोलिसनामा ऑनलाईन

पुणे येथील कोंढवा परिसरात पोलीस व्हॅनने (एमएच 42 बी 6948) सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार आज (शुक्रवार) संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान घडला. या पोलीस व्हॅनचा चालक मद्यपान करुन व्हॅन चालवत असल्याने हा अपघात घडला असून या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

व्हॅन देण्यामागचा मुख्य उद्देश विसरून त्याचा वापर लग्नाचे व-हाड नेण्यासाठी केला जात आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर उभ्या असलेल्या सात ते आठ वाहनांना या व्हॅनने जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटना घडली त्यावेळी चालक मद्यधुंत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हारयल झाल आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसनामाच्या वार्ताहराने शहर नियंत्रण कक्ष तसेच स्थानीक पोलिसांकडे या विषयी विचारणा केली असता असे काही घडले नसल्याचे सांगण्यात आले. रस्त्यामध्ये एवढा मोठा अपघात होऊन ही पोलिसांकडे या संदर्भात काहीच माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांची भूमिका आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेवर शंका व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाचे : ही घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली असून ती गाडी राज्य राखीव पोलीस दलाची होती. या गाडीच्या चालकाने मद्यपान केल्याचे माहिती पोलीसांनी दिली.