माढा येथे पाण्याच्या टबमध्ये पडून एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

माढा : पोलीसनामा ऑनलाईन

घराजवळ खेळत असताना पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माढा शहरात घडली. माढा शहरातील शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली.

दुर्वा सायबू शिंदे (वय -1 वर्षे) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागामध्ये सायबू मारुती शिंदे हे आपल्या दोन मुले एक मुलगी आणि पत्नीसमवेत राहत आहेत. दुर्वा ही त्यांची सर्वात लहान मुलगी. दुर्वा घराजवळ खेळत असताना पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. शेजा-यांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुर्वाला ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुर्वाचे वडील सायबु हे आसपासच्या गांवामधील जत्रेमध्ये हाताील कडे, कानातील कुंडल इत्यादी वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. दुर्वाच्या मुत्यूमळे परिसरत हळहळ व्यक्त होत आहे.