मेक इन महाराष्ट्र्र प्रकल्प राबविण्यात हे सरकार अपयशी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील कंपन्या मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये गेल्या. यामुळे तरुण वर्गाचा रोजगार गेला. यासमस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना करत असल्याचे दिसत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्याने तिथे कंपन्या जात आहे. त्यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे पंतप्रधानांना समोर नि:शब्द असल्याचे दिसते. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यातील विविध भागातील तरुण वर्गाच्या हाती रोजगार नसल्याने तरुण वर्ग नैराश्येच्या खाईत लोटला आहे. यावर सरकार काहीही उपाय योजना करता असलयाचे दिसत नाही. त्यात या सरकारकडून ‘मेक इन महाराष्ट्र्’ अंतर्गत दरवर्षी रोजगार उपलब्ध होणार अशी घोषणा करण्यात आली होती. ही घोषणांच राहिल्याचं सद्य स्थितीला दिसून येत असून आता दोन दिवसापूर्वी मैग्निटीक महाराष्ट्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र हीच घोषणा आम्ही आघाडी सरकारच्या काळात केली होती.असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधत ते पुढे म्हणाले की,”मेक इन महाराष्ट्र्र प्रकल्प राबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने त्यांना मॅग्निटीक महाराष्ट्र प्रकल्प हाती घेण्याची वेळ आल्याचे,” म्हणत मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्याचबरोबर मेकइन महारास्ट्रचा लाभ घेतलेल्या तरुण आणि कंपन्याची आकडेवारी देखील सरकारकडून खोटी सांगण्यात आली आहे. ही निषेधार्थ बाब असून सर्व यामुळे भविष्यात राज्यासमोर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.