हिंदू आणि मुस्लिम मुद्यावर भाजप निवडणूक लढवेल : प्रशांत भूषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील आगामी लोकसभा निवडणूक भाजप अयोध्या हिंडून आणि मुस्लिम या मुद्यावर निवडणूक लढविली जाईल.असे विधान स्वराज्य अभियानचे प्रशांत भूषण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले. तर येत्या काळात हेच सरकार समाजातील विविध घटकात दंगली घडवेल. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या कार्यपध्द्तीवर सडकून टीका केली.
यावेळी प्रशांत भूषण म्हणाले की, केंद्रात भाजप सरकार आल्यापासून निवडणुकांपूर्वी दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पुर्तता केली नाही. तर उलट त्यांनी काँग्रेस च्या पुढे जात देशात भयानक परिस्थिती आणली आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार हे भाजप सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी तरुणांना रोजगार दिला जाईल, शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाईल. अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या. मात्र त्याची आज अखेर अमलबजावणी केली नाही. ही शोकांतिका असून याच सरकारने दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यातून काही ही सद्या झाले नाही. फक्त त्यामध्ये उद्योगपतींचे हित साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदी निर्णयातून कॅशलेस व्यवहाराकडे जात असल्याचे सांगितले गेले. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाने देशातील नागरिकांकडे पैसे राहिले नसल्याने अशा प्रकारे कॅशलेस केले आहे.अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, देशात सद्या अस्थिरता असून त्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असून रोजगार,भ्रष्टाचार यासह अनेक मुद्द्यावर लढण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अण्णा हजारे हे येत्या काळात आंदोलनास सुरुवात करणार आहेत.त्या प्रश्नावर ते म्हणाले की,अण्णांनी यापूर्वी देखील लोकपाल बिला बाबत आंदोलन उभारले. त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर आता त्यांनी भ्रष्टाचारा सारख्या मुद्यावर लढावे.त्याचे आम्ही स्वागत करू. असे सांगत त्यांनी एक प्रकारे अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठींबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
न्यायधीश लोया यांच्या मृत्य प्रकरणी ते म्हणाले की,लोया प्रकरणी अनेक माहिती समोर येईल.या भीतीने सरकार कोणत्याही प्रकारची पाऊले उचलत नाही.अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.