दहा वर्षांच्या मुलाने ओळखले हल्लेखोरांना

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

हिवरे येथील तीन महिल्यांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज (सोमवार) झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान त्याने हल्लेखोरांना ओळखले. दोघांचाही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय सातवळेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.

खानापूर तालुक्‍यातील हिवरे येथे तीन वर्षांपूर्वी तीन महिलांची हत्या करण्यात आली. या खटल्याची सुनावणी 11 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयात सुरू झाली असून विशेष सरकारी वकील निकम हे सरकारपक्षाची बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीत शोभाताई पाटील यांचा सरतपास ऍड. निकम यांनी घेतला. त्यानंतर पहिल्या दिवशी घटनास्थळाची माहिती व न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्र हा धागा पकडून बचाव पक्षाचे वकील सुतार यांनी साक्षीदार शोभाताई पाटील यांचा उलटतपास केला. यात जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर दहा वर्षीय सूरज पाटील याचा सरतपास घेण्यात आला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता.

खानापूर तालुक्‍यातील हिवरे हे त्याचे आजोळ आहे. घटना घडली त्याआधी दोन दिवस दोन आजी-आजोबांना भेटण्यासाठी आईसोबत गेला. तेव्हापासूनचा घटनाक्रम त्याने त्याने न्यायालयासमोर सांगितला. तिघांचा खून करणाऱ्या हल्लेखोरांनाही त्याने न्यायालयामोर ओळखले. यापूर्वी ओळख परेडवेळीही त्याने नऊ जणातून या दोघांना ओळखले होते. विशेष बाब न्यायालयाने नोंदवून घेतली. त्यानंतर ऍड. सुतार यांनी उटतपास घेतला. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेले सुधीर सादाशीव घोरपडे व रवींद्र रामचंद्र कदम हे दोघे न्यायालयासमोर हजर होते.

[amazon_link asins=’B01N54ZM9W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’969af1a8-d083-11e8-b3a9-6bd35c6f0283′]
सोन्याची चेन वितळल्यानंतर निघाले तांबे

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध बँकांत तारण ठेवलेल्या बनावट सोन्याचे दागिने खरे की खोटे याची चाचणी करवीर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी घेतली. जप्त केलेल्या साडेतीन तोळ्यांंच्या चेनची दसरा चौकातील एका नामवंत ज्वेलर्समधील मशीनमध्ये तपासणी केली असता २१.४ कॅरेट सोने दाखविले. त्यानंतर हीच चेन वितळून तिची पुन्हा मशीनमध्ये तपासणी केली असता पूर्णत: तांबे असल्याचे स्पष्ट झाले.संशयितांनी मूळ तांब्याच्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा देऊन ते सोने असल्याचा बनाव करून बँकांची फसवणूक केल्याचे ज्वेलर्सच्या तज्ज्ञांनी सांगितले. आरोपींनीही सर्वच दागिने तांबे असल्याची कबुली दिली. इनकॅमेरा झालेल्या चाचणीचा पोलिसांनी पंचनामा केला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आनंदराव विष्णू राक्षे (४२, रा. सुभाषनगर, कोरेगाव सातारा) यांच्यासह दागिने पुरविणारा व्यापारी फरार आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.