आय कॉलेज विद्यार्थी संशोधन प्रदर्शनात १२२ प्रकल्प सादर

इंदापूर : पोलीसनामा 

(प्रतिनिधी – देवा राखुंडे)

इंदापूर येथील आय कॉलेज विद्यार्थी संशोधन प्रकल्प प्रदर्शनात स्पर्धेत १२२ प्रकल्प विध्यार्थांनी सादर केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि संशोधन प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले.
ही स्पर्धा कला मानव्य विद्या , वाणिज्य, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रीकी व तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्र या सहा विभागात घेण्यात आल्या. स्पर्धेत मध्ये २२९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B074G3TJYF,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eebd697e-b71f-11e8-a8a8-ab4f47792755′]

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद शहा म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक पातळीवर जाणवणाऱ्या ओला व सुका कचरा व्यवस्थापनावर तंत्र विकसित करण्याचे तसेच मांडलेल्या प्रकल्पांचे व्यावसायीक तत्वावर मांडणी करून आपले तंत्रज्ञान सक्षम बनवावे.

विध्यार्थांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण व्हावी तसेच कल्पकता विकसीत व्हावी या उद्देशाने अशा उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली. योगेश धनवडे  व पूजा चोपडे  यांनी सादर केलेला रिमूव्हल ऑफ टॉक्झीक लेड वेस्ट वॉटर यूजींग निम पावडर, प्रतिक पांढरे  व रूपाली तारे यांनी सादर केलेला निकोटीन अॅज इंसेक्टी साईड, शितल कोकरे  व नेहा देशमुख यांनी सादर केलेला मेकींग ऑफ हर्बल टी फ्रॉम मेडिसीनल प्लांट , मकरंद देवकर याने सादर केलेला इलेक्ट्रीसीटी जनरेशन यूजींग नॅचरल सोर्स, प्रतिक जाधव  याने सादर केलेला आयसालेशन ऑफ पेस्टी साईड डिग्रेडिंग मायक्रो ऑरगॅनिझम फ्रॉम सॉइल , माऊली मस्के व दिपक सावंत यांनी सादर केलेला मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मिल्क अडल्ट्रेशन, सोनाली पवार यांनी सादर केलेला गावगाडा, काकडे यांनी सादर केलेला नाण्यांचा इतिहास, चैतन्य दहीवळ याने सादर केलेला जी.एस.टी. संदर्भातील प्रकल्प विद्यार्थांचे लक्ष वेधुन घेत होते अशी माहिती संशोधन प्रकल्प स्पर्धेचे सहाय्यक समन्वयक प्रा. अब्दुललतीब शेख यांनी दिली.
डॉ.राजेंद्र साळुंखे, प्रा. विरेशहोळकुंदे, डॉ.कबनुरकर पी. एस., प्रा.डी.के. भोसले, डॉ. गावडे आर.पी., डॉ.पवार एस.एन.,प्रा. गायकवाड व्ही. एस., डॉ. कदम जी.जी., प्रा. यादव जी.सी.,प्रा. सागर भोसले, प्रा. ढगे गणेश, प्रा. हेगडे अनिकेत,प्रा. कांबळे ए.व्ही., प्रा. कदम सागर, प्रा.ज्ञानेश्वर शिंदे यांनी परीक्षण केले.