ताज्या बातम्या

महामार्गावरील भीषण अपघातात दोघे ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई – आग्रा महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात गोराणे, ता. शिंदखेडा फाट्याजवळ झाला. गोकुळ मगन ठाकरे (26, रा. नर्मदा काॅलनी, अक्कलकुवा), प्रदीप निर्मल चव्हाण (27,विजय नगर नाशिक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर महिती, गोकुळ आणि प्रदीप हे दोघेजण सोनगीर गावाहून शिरपूर कडे जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक जोरदार असल्यामुळे दोघेही दुरवर फरफटत गेले. धडकेनंतर दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहून वाहन चालक फरार झाला. काही वेळाने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांना उपचारासाठी तात्काळ जवळील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर दोघेही मयत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर अर्धातास वाहतूक खोळंबली होती. वाहतूक सुरळीत करताना पोलीसांची तारांबळ उडाली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या