पोलीस घडामोडी

२ पोलीस तडकाफडकी निलंबित

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस वर्धापन दिनानिमित्त जळगावात आयोजित शस्त्र प्रदर्शनातून रिव्हॉल्वर चोरीला गेल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती. या चोरी प्रकरणी पोलीस नाईक विजय अभिमन शिंदे व कॉ. योगेश श्रीराम मासरे या दोन जणांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तसेच राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात टेबल क्रमांक ४ वर विजय शिंदे यांची तर टेबल क्रमांक १ वर योगेश मासरे यांची नेमणूक करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणाला जाताना तेथे दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नाही, तसेच पूर्वपरवानगीशिवाय टेबल सोडला. त्याच वेळी ३८ स्ट्रम रुगल हे रिव्हॉल्वर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

रिव्हॉल्वर चोरी झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामानंद नगर पोलीस व उपअधीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु होती. त्यात शिंदे व मासरे हे दोषी आढळल्याचा अहवाल उपअधीक्षकांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक शिंदे यांनी गुरुवारी रात्री या दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या