मुंबईतील २७ हॉटेल्सचे परवाने एफडीएकडून रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील २७ हॉटेल्सना निकषांचे पालन न केल्याने नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच त्यांचे परवाने रद्द केले आहेत. अन्न व औषध प्रशासनतर्फे हॉटेल्समधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, कच्चा माल, तसेच तयार होणाऱ्या पदार्थांचे गुणवत्ता अशा विविध गोष्टींची तपासणी करून निकषांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे धोरण अन्न व औषध प्रशासनाने अवलंबले आहे.

मुंबईतील हॉटेल्सनी निकषांचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. हॉटेलमध्ये स्वच्छताविषयक तरतुदींची सुधारणा न झाल्यास पुन्हा फेरतपासणी होते. त्यातही सुधारणा न झाल्यास परवाने रद्द केले जातात. यात अपीलाचीही संधी मिळते, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.