वाह पोलीस …! रिक्षात विसरलेला २८ हजाराचा ऐवज प्रवाशाला परत मिळवून दिला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे रिक्षात विसरलेली  बॅग परत केल्याच्या बातम्या आपण पहिल्या असतील आज पुण्यात देखील अशीच एक घटना घडली पण या घटनेत पोलिसांनी एका प्रवाशाला मोठ्या हुशारीने रिक्षात विसरलेली  त्याची बॅग परत मिळवून दिली .या बॅग मध्ये रोख रकमेसह २८ हजाराचा ऐवज होता.

याबाबत चंद्रकांत केशवराव पाटील यांनी पोलीस नाईक शेडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल बलटु घाडगे,वलवी यांचे आभार मानले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रवासी  चंद्रकांत केशवराव पाटील (३२) हे नेहमी प्रमाणे भाजी आणि काही घरगुती सामान खरेदी करण्याकरिता शेअर रिक्षाने गोटीराम भैय्या चौक येथे आले होते. रिक्षातून उतरल्यानंतर त्यांना लक्षात आले की , आपली बॅग रिक्षातच विसरली आहे. असे लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळच ड्युटीला असलेल्या पोलिसांना पाचारण केले . बॅग  विसरल्याचा सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला . पोलिसांनी पुन्हा गोटीराम भैय्या चौक येथे पुन्हा जाऊन ती रिक्षा आहे का ते पाहिले . पण ती रिक्षा तिथे नव्हती . त्यानंतर पोलिसांनी इतर रिक्षा चालकांकडून त्या रिक्षावाल्याची माहिती घेतली विशेष म्हणजे प्रवासी पाटील यांना रिक्षाचा नंबर माहिती नव्हता . तरी देखील पोलिसांच्या आणि पाटील यांनी संगीतलेल्या वर्णनावरून त्या रिक्षाचालकांचा शोध घेण्यात आला ज्यामधून पाटील यांनी प्रवास केला होता.

अखेरीस ही रिक्षा स्वारगेट  परिसरात आढळली. त्या रिक्षाचालकाने आपले नाव विजय रामदास सांबळे असे संगितले.  बॅग बाबत रिक्षाचालकाला विचारले असता त्याने रिक्षाची डिग्गी  तपासायला सांगितली . पोलिसांनी तपास केला असता बॅग आढळली आणि त्या बॅग मध्ये पाटील यांचे  ( 8,000/- रोख, 20,000/- रूपये.कि.चा सॅमसंग  मोबाइल  व ईतर चीजवस्तू) असे एकुण  28,000/- रू किमतीचा चा ऐवज सापडला.  बॅग मिळवून दिल्याबद्दल पाटील यांनी पोलिसांचे आभार मानले.