क्राईम स्टोरी

अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक ; ८ लाखांच्या गाड्या जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे आणि कळवा परिसरातील 3 अट्टल दुचाकी चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर चोरांकडून ८ लाख २५ हजार किमतीच्या २१ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलिस उपायुक्त स्वामी यांनी सांगितले. ठाणे आणि कळवा परिसरात या चोरांनी धुमाकूल घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबतीत अनके तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्यांच्या शोधात होते. त्यांच्या चोरीमुळे दुचाकींना घेऊन चांगलीच दहशत परिसरात पसरली होती. अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसत होते. ठाणे व कळवा परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलीस या चोरांच्या शोधात कसून तपास करत होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि ठाणे, कळवा परिसरातील या 3 चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले.

सदर चोरांचा शोध घेताना आज ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. आणि 3 अट्टल दुचाकी चोरांना अटक केली. सदर चोरांकडून २१ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शिवाय पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर ठाणे व कळवा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे दिसत आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या