सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्टल ६ काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली येथील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून ३ पिस्टल आणि ६ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सिंहगड रोड पोलिसांनी शनिवारी (दि.२६) नवले ब्रीज जवळ सापळा रचून केली. विश्वजीत उर्फ गुंडा विलास माने (वय-२७ रा. मुपो. आंधळी ता. पलूस, जि. सांगली), आकाश राजेंद्र बिरणे (वय-२३ रा. मुपो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली), उदय रघुनाथ मोरे (वय-२६ रा. मुपो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

सांगली जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगार पुण्यामध्ये येणार असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नवले ब्रीज येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ ३ पिस्टल आणि ६ जीवंत काडतुसे सापडली. आरोपींवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हे शस्त्र कोठून व कशासाठी आणली आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परीमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जिवन मोहिते, पोलीस कर्मचारी वसंत राऊत, शिवाजी भोईटे, अनिल बोत्रे, संतोष सावंत, मोहन भुरुक, दयानंद तेलंगेपाटील, सचिन माळवे, मयुर शिंदे, दत्ता सोनावणे, यशवंत ओंबासे, वामन जाधव, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहूल शेडगे, श्रीकांत दगडे, योगेश झेंडे, रफीक नदाफ, निलेश जमदाडे, किशोर शिंदे, हरीष गायकवाड, बालाजी जाधव, निलेश कुलथे, मयुर पतंगे यांच्या पथकाने केली.