भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर

रहाटणी- पिंपरी पोलीसनामा ऑनलाईन : भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर. रहाटणी शहरातील नखाते नगरच्या समोरील एका स्टील सेंटर मध्ये हि घटना घडून आली. या दुकाना मध्ये अनधिकृत पणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री सुरु होती . हि माहिती महसूल विभागला मिळाली असता , गुरुवारी दुपारी बराच्या सुमारास अधिकाऱ्यांनी या दुकानावर छापा टाकून त्यात ३६  सिलेंडर जप्त केले.

जनता स्टील सेंटर दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडरचा  काळाबाजार चालू होता. आणि हे घेऊन चार किलोचे सिलेंडर भरून ते ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करत होते. यात विविध कंपनीचे भरलेले सिलेंडर यावेळी आढळून आले. यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे दोन सिलेंडर भारत पेट्रोलियमचे चार सिलेंडर खाजगी कंपनीचा एक सिलेंडर तसेच भारत पेट्रोलियमचे चार किलो चे नऊ सिलेंडर यावेळी या छाप्या मध्ये आढळून आले. हा सर्व मुद्देमाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून वाकड पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून हि संपूर्ण कारवाई नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जनता स्टील सेंटर या दुकानदाराला चार किलो सिलेंडर भरण्यासाठी एका खाजगी गॅस सप्लाय करणाऱ्या एजन्सीने २० सिलेंडर भरलेला टेम्पो आणून तो खाली करत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने ही कारवाई केली जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.