खेड तालुक्यातील दारुभट्टी उद्धवस्त, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा आणि चाकण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोई येथील दारु भट्टीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीच वाजता सुरु करण्यात आली होती. तर साडेपाच वाजता कारवाई संपली. या कारवाईत दोघांना अटक करुन ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T,B07FW8KSFP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1764819e-bc23-11e8-b9ea-279d3678a082′]

आशा गणपत राठोड (वय-३८), निर्मला महेंद्रसिंग राठोड (वय-३४ दोघे रा. रा. फलके वस्ती, मोई, पो. कुरुळी. ता.खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या पथकाने आणि चाकण पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ८७५ लिटर तयार दारु, १९ हजार लिटर दारु तयार करण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. तर ४ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
[amazon_link asins=’B00DRLASZ6,B00C9Q5PGM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23061b08-bc23-11e8-83ab-114af7901832′]

सलग दुसरी कारवाई
चिंबळी गावात इंद्रायणी नदीकाठी असलेली गावठी दारू बनविण्याची मोठी भट्टी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून उध्वस्त केली. १ हजार लिटर तयार दारू आणि ३५ हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन या वेळी नष्ट करण्यात आले. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांच्यासह चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अलसटवार आळंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र चौधर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली होती.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.