लोहमार्ग पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कानमुळे ४८ मुले स्वगृही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हरवलेल्या तसेच अपहरण झालेल्या बालकांच्या शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेअंतर्गत पुणे लोहमार्ग पोलिसांनी एका महिन्यात तबल ८७ बालकांचा शोध घेण्यात यश आले आहे. यातील ४८ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले असून, ३४ बालक हे परराज्यातील आहेत. त्यामुळे त्यांना बाल कल्याण समितीकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून गेल्या काही वर्षात हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या वर्षीत डिसेंबर महिन्यात ही मोहीम राबविण्यात आली आहे. शहरात सिग्नल तसेच चौका-चौक त्यासोबतच लोहमार्ग परिसरात लहान मुले आढळून येतात. बहुतांश परराज्यातील मुलांचा सहभाग आहे. यामुळे पोलिसांकडून अशा मुलांचा शोध घेतला जातो.

लोहमार्ग पोलिस अधीक्षक दीपक साकोरे, अप्पर अधीक्षक तुषार पाटील यांनी अशा मुलांचा जास्तीत जास्त शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यासाठी विशेष पथक तयार केले होते. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात निरीक्षक मनोज खंडाळे, सहायक निरीक्षक दिपाली मोरे व त्यांच्या पथकाने त्यांच्या हद्दीतील तब्बल ८७ बालकांचा शोध घेतला. तसेच, यानंतर या त्यांच्या पालकांचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. ही मुल पालकांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्या सारखा होता. दरम्यान, यातील ३४ बालके परराज्यातील आहेत. त्यांना बाल कल्याण समितीकडे स्वाधीन केले आहे. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे.