चाकण पोलिसांकडून खूनासह 5 जबरी चोरीचे गुन्हे उघड

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण आणि परिसरात जबरी चोर्‍या करणार्‍या टोळीतील दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून जबरी चोरीचे 5 आणि खूनाचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. अटक केलेल्यांचा एक अल्पवयीन साथीदार देखील ताब्यात घेण्यात आला असुन त्यांच्याकडून 4 मोबाईल, 2 मोटारसायकली असा एकुण 1 लाख 25 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे.

आदिनाथ बाळु राऊत (रा. भांबोली, ता. खेड) आणि ऋतिक बाळासाहेब गायकवाड (रा. वासुली, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 6 नोव्हेंबर रोजी निष्कलंग आंद्रेश डांग (18, रा. संभाजी पडवळ चाळ, बोरदरा आंबेठाण, ता. खेड) हे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोद्दार स्कुल येथुन कोरेगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी आरोपींनी दोन मोटारसायकलवरून जावुन त्यांच्याकडील 7 हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले होते. त्याबाबत चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चाकूने सपासप वार करुन युवकाचा खून

सदरील गुन्हयाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींना दि. 11 नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी परिसरात 5 जबरी चोर्‍या केल्याचे तसेच दि. 29 जुलै रोजी जबरी चोरी करीत असताना सुयश गुंड (23, रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर) यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपींचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा चाकण पोलिस शोध घेत आहेत. पोलिस आयुक्‍त पद्मनाभन, अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे, उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार, पोलिस निरक्षक सुनिल दहिफळे, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, विक्रम पासलकर, पोलिस हवालदार शिवानंद स्वामी, पप्पु हिंगे, पोलिस नाईक संजय जरे, संदिप सोनवणे, कर्मचारी निखील वरपे, मच्छिंद्र भांबुरे, अनिल गोरड, हनुमंत कांबळे आणि संपत मुळे यांच्या पथकाने आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकुण 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरिष्ठ निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम पासलकर अधिक तपास करीत आहेत.