थर्ड आय

चिमुरडीने गिळला चक्क एलईडी बल्ब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील एका पाच वर्षाच्या चिमुरडीने चक्क एलईडी बल्ब गिळल्याची घटना घडली आहे. हा बल्ब तिच्या छातीत अडकला होता. तिला श्वास घेताना अडचणी येत होत्या मात्र वेळीच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुण तिचे प्राण वाचवले. ही शस्त्रक्रिया मुंबईतील लिलावती रूग्णालयात पार पडली.

याबाबत मिळेल अधिक माहिती अशी की, घराच्या सजावटीसाठी हा एलईडी बल्ब आणला होता. समृद्धीने हा बल्ब उचलला व तोंडात टाकला आणि पटकन तिने तो गिळला. बल्ब गिळल्यानंतर समृद्धीला खोकला सुरु झाला व तिला श्वासोश्वास करताना त्रास होऊ लागला. समृद्धीची आई रुपाली तिला नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेली. तिथे ब्रॉनचोस्कोपी सुरु असताना समृद्धी बेशुद्ध झाली. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यानंतर तिला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर या मुलीचे सिटीस्कॅन करण्यात आले छोटा बल्ब डाव्या फुफ्फुसांच्या खालील भागात अडकला होता. हा बल्ब शरीरातील मोठ्या धमनींच्या जवळ असल्याने तो शरीरात अडकून राहणं धोकादायक होतं. त्यामुळे तातडीने यामुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्यानंतर मुलीच्या प्रकृतीत देखील सुधारणा झाली. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या चार दिवसानंतर मुलीला घरी सोडण्यात आलं.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button