विमा सल्लागार असल्याचे सांगून वृद्धाची ५२ लाखांची फसवणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विमा कंपनीमध्ये सल्लागार असल्याचे सांगून एका वृद्ध इसमाला ५२ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार भांडूपमध्ये उघडकीस आला आहे. दोन दिवसांमध्ये दीड लाख रुपये मिळवून देण्याच्या बहाण्याने या भामट्याने ७६ वर्षीय वृद्धाची फसवणूक केली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाहूर रेल्वे स्थानकाजवळील (पू) स्वस्तिक हाऊसिंग सोसायटीत राहत असलेले रामचंद्र गांगुर्डे (वय ७६) यांना शुक्रवारी दोघे तरुण भेटले. विविध कंपनीमध्ये विमा कंपनीत सेंटलमेंट अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला दोन दिवसामध्ये १ लाख ३५ हजार रुपये मिळवून देतो, मार्च एन्डींगजवळ आले असल्याने सध्या विविध ऑफर आल्या आहेत, असे सांगून शासनाची बनावट कागदपत्रे दाखवली.रामचंद्र गांगुर्डे त्यांच्या विश्वास बसल्यानंतर एनएफटीद्वारे बँक खात्यावर ५२ लाख ३७ हजार रुपये भरण्यास सांगितले. खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर ते फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

लोकसभेची रणधुमाळी : अखेर सोमवारी होणार सेना-भाजप युतीची घोषणा
११ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २२ उपनिरीक्षकांच्या बदल्या