७ महिलांना लग्नाच्या आमिषाने १४ लाखांना गंडा, लखोबा गजाआड

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मी मोठा हॉटेल व्यावसायिक आहे, असे खोटे सांगून वधू-सूचक संकेतस्थळाच्या आधारे घटस्फोटीत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे पैसे लुबाडणाऱ्या स्त्रीलंपट लखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे. महेश अशोक कुलकर्णी (३८) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत या लखोबाने ७ उच्चभ्रू महिलांना १४ लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या भामट्याने मुंबईसह कल्याण, विरार, पुणे, गोवा, बंगळूरु शहरातील अनेक घटस्फोटीत महिलांना सावज केले.
महेश कुलकर्णी हा कॉमर्स पदवीधर असून लग्न जुळविणाऱ्या हायप्रोफाईल विवाह सूचक संकेतस्थळावर असलेल्या महिलांना लग्नाचे आमिष दाखवत असे. आपला हॉटेल व्यवसाय आहे, अशी थाप मारून तो महिलांकडे असलेल्या पैशाचा अपहर करून त्यांना गंडा घालत होता. आतापर्यंत त्याने ७ पेक्षा अधिक महिलांना फसविल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून १४ लाख रुपये उकळले आहेत. जुहू येथील हरे राम हरे कृष्ण मंदिराजवळ राहत असलेला हा भामटा महेश कुलकर्णी भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याने बंगळुरू येथील एका कापड व्यावसायिक महिलेशी ओळख केली. ओळखीनंतर तिचा विश्वास संपादन करून कुलकर्णीने आपण हॉटेल व्यावसयिक असल्याचे तिला खोटे सांगितले. तसेच आपल्याला कामानिमित्त सतत विमान प्रवास करावा लागतो असेही त्याने तिला सांगितले. आपल्याकडे प्रवासासाठी कार नसल्याचे सांगत महेश कुलकर्णीने त्या कापड व्यावसायिक महिलेकडून तिची एकस्युव्ही कार घेतली. कार ताब्यात येताच त्याने संबंधीत महिलेशी संपर्क तोडला. मात्र, आपली कार मुंबईत आल्याची माहिती मिळताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.

सेक्स रॅकेट चालविण्यासाठी त्यांनी गोव्यात बंगलाच घेतला भाड्याने 

फसवणूक झालेली ही महिला गोवा येथे राहते. या भामट्याने गोव्यातील अन्य एका महिलेला यापूर्वी गंडा घातला होता. तिनेही ई-मेलवरून एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. या महिलेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून त्याने आपले गोव्यात हॉटेल असल्याचे तिला खोटे सांगितले होते. त्यानंतर विविध कारणे सांगून या महिलेकडून त्याने ८ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर महिलेला संशय आल्याने तिने महेश कुलकर्णीची पडताळणी केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलेने एअरपोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी महेश कुलकर्णी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान महेशने बंगळुरु येथील एका महिलेला त्याच्याबाबत काही टिप्स दिल्या. त्यानंतर महिलेने त्याच्याशी संपर्क केला. हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर सावज जाळ्यात आल्याचे वाटल्याने महेश कुलकर्णी हा त्या महिलेला एअरपोर्ट जवळील पार्कींगजवळ भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.