ताज्या बातम्या

निकृष्ट बांधकामामुळे ८ मजूर जखमी

एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देहरे तालुका नगर येथील नगर-मनमाड रोडवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे. निकृष्ट स्लॅब टाकल्यामुळे आज बांधकाम सुरू असतानाच तेथील ८ मजुरांच्या अंगावर स्लॅब कोसळला. यात ८ मजूर जखमी झाले आहेत.  त्यांना उपचारासाठी तातडीने विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अडकलेल्या  मजुरांना बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले. देहरे येथील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने मदतीला धावले होते.

नगर-मनमाड रस्त्यावरील देहरे शिवरात एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टाकीवर स्लॅब टाकला आहे. शारदा इन्फ्रास्ट्रक्चर, औरंगाबाद या बांधकाम कंपनीच्यावतीने सदर कामाचा ठेका घेण्यात आला आहे. आज सकाळी अकरा वाजता घडलेली देहरे येथे काम सुरू असताना अचानकपणे स्लॅब कोसळला. यात ८ मजूप सापडून जखमी झाले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या