१५ वर्षांपासून सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘या’ ८० औषधांवर बंदी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाजारात आजही बंदी असलेल्या औषधांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. बाजारात १५ वर्षांपासून विकल्या जाणाऱ्या पोटदुखी, ताप, रक्तदाब व निद्रानाशासारख्या आजारांवरील ८० औषधांच्या निर्मिती वा विक्रीची परवानगी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. या औषधांच्या निर्मितीसाठी कंपन्यांनी राज्य सरकारकडे परवान्याचा अर्ज केला होता. राज्यांनी ते मंजूरही केले होते. आता या औषधींवर बंदी आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना छपाईसाठी पाठवली आहे.
मंत्रालयातील सूत्रांनुसार, या औषधांवरील बंदी त्या दिवसापासूनच लागू हाेईल. ही औषधे इतर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉल्टपासून तयार हाेत असल्याने अपायकारक ठरतात. या औषधांत सॉल्ट अनावश्यक असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका असतो. सातत्याने या गोळ्या घेतल्याने रुग्णांवर त्यांचा प्रभावी परिणाम हाेत नाही.

त्या औषधांना सीडीएससीओ ची मंजुरी नाहीच
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) अधिकाऱ्याने सांगितले, कोणतेही नवीन औषध बाजारात येण्याआधी सीडीएससीओकडून मंजुरी घ्यावी लागते. मंजुरी देण्यासाठी सीडीएससीओ औषधाची गुणवत्ता व शरीरावर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन करते. मात्र या ८० औषधांना बनवण्यासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. स्टेट ड्रग कंट्रोलरने आपल्या पातळीवर कंपन्यांना मंजुरी बहाल केली. ही बाब आता समोर आली आहे.

ही औषधे विनामंजुरीची, घातक असल्याचा दावा 
— अँटिबायोटिक्स 
सेफटॅक्लेव्ह
सेफग्लोब ओझेड
वानको प्लस
— रक्तदाब 
लोरॅम-एच
सारटेक
टेराम-एच
— वेदना/ताप 
निसिप कोल्ड
आँडम पी
ल्यूपिस्ट्रोन प्लस
–अँटिफंगल 
ऑरफ्लेज किट
व्हॅगिनोव्हेकट

या कंपन्या करतात या औषधांची निर्मिती
इन्टॉस, अ‍ॅबॉट, अ‍ॅरिस्टो, अल्केम, मॅनकाइंड, सिप्ला अशा अनेक कंपन्या अशा फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधे तयार करत असतात. त्यात वेगळ्या औषधी तयार करण्याची गरज पडू नये म्हणून विविध आजारांवरील औषधांना एकत्र करून एकच गोळी बनवत आहेत. अशी औषधे तयार करणे हा विकसित देशांत गुन्हा आहे. मात्र भारत व इतर काही विकसनशील देशांत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे  डॉ. के.के. अग्रवाल, माजी अध्यक्ष आयएमए यांनी म्हंटले आहे.