४६ लाख रुपये घेऊन परदेशात पळालेल्या व्यावसायिकाला ९ वर्षानंतर आणले परत

नवी दिल्ली : बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या, निरव मोदी यांना भारतात परत असणण्यास सीबीआयला यश आले नसले तरी ९ वर्षापूर्वी केवळ ४६ लाख रुपयांचा घोटाळा करुन परदेशात पळून गेलेल्या एकाला परत आणण्यात सीबीआयला यश आले आहे.

सीबीआयच्या पथकाने  मोहम्मद याह्या नामक फरार घोटाळेबाजाला अटक केली आहे. मोहम्मदने ९ वर्षांपूर्वी भारतातून पलायन केले होते. तत्पूर्वी त्याने देशातील अनेक बँकांना गंडा घातला होता. मोहम्मदने ४६ लाख रुपये घेऊन बँगलोरमधून पलायन केलं होते.
विजय मल्ल्या आणि निरव मोदी यांनी देशातील बँकांना हजारो रुपयांना चुना लावून पळ काढला. त्यानंतर, बँकांची आर्थिक फसवणूक करुन पलायन करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यासाठी आॅगस्ट महिन्यात कायदाही बनविण्यात आला आहे. त्यानंतर, हे पहिलेच प्रकरण आहे. ज्यामध्ये एका पळपुट्या आरोपीला सरकारने भारतात आणले आहे. बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहूल चोक्सीपेक्षा या घोटाळेबाजाने अत्यंत कमी घोटाळा केला आहे. मात्र, तपास यंत्रणांनी त्याला अटक करणे हे या मोहिमेच्या दृष्टीने पडलेले पहिले सकारात्मक पाऊल आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3054ccc-d112-11e8-bddd-a7b784aae48d’]
दरम्यान, याह्या यास बेहरीन येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय तपास यंत्रणांची त्याच्यावर नजर होती. सन २००९ मध्ये याह्याविरुद्ध सीबीआयने कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, तोपर्यंत तो देश सोडून पळाला होता. सध्या भारत सरकारकडे २८ पळपुट्यांची यादी असून त्यामध्ये ६ महिलांचाही समावेश आहे.
[amazon_link asins=’B078HYJSS3,B0716MD8MP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d8fb14b-d113-11e8-80d5-eff8b614d7bb’]