पॅसेंजरची वाट पहाणाऱ्या कार चालकाला मारहाण करुन कार पळवली

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

भाडे मिळण्याची वाट पहात उभे असलेल्या कारचालकाला चार जणांनी मारहाण करुन कार चोरुन नेली. ही घटना गुरुवारी (दि.११) पहाटे सहाच्या सुमरास बालेवाडी येथील जुना जकात नाका येते घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbb7ae22-ce04-11e8-b14c-cf04a24711df’]

विकी रमेश लोणकर (वय-२७ रा. जयभवानी संतोष मंगल कार्य़ालयासमोर, थेरगाव) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी लोणकर यांची परमिट कार असून गुरुवारी पहाटे ते बालेवाडी येथे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाट पहात उभे होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चारजण कारजवळ आले. त्यापैकी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने विकीला चाकूचा धाक दाखवून कारमधून खाली उतरवले. त्याच्याकडे पैशांची मागणी करुन त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन ३ लाख रुपये किंमतीची वॅगनर कार चोरुन नेली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टी.एम. फड करित आहेत.

पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर

या परिसरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना आरोपी पकडण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सीसीटीव्ही नसल्याचा फायदा चोरटे घेत असून या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5c33e9b-ce05-11e8-9b1f-cf894d441ea8′]

पायी जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण, एकाला अटक

पुणे  :  कोरेगांव पार्क येथील साऊथ मेन रोडवून पायी घरी जाणाऱ्या रामकृपाल कृष्णदेव यादव (वय-४३ रा. कोरेगाव पार्क) यांच्या तोंडावर फळी मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरमी यादव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विकास श्याम परदेशी (वय-२३ रा. कोरेगाव पार्क) याला अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडला. फिर्यादी हे पायी घरी जात असताना काहीएक कारण नसताना आरोपीने त्यांच्या तोंडावर फळी मारली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.