दिल्लीत शरद पवारांच्या घरी महाआघाडीच्या बैठकीत ‘हे’ ठरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री  फारुख अब्दुला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची मंगळवारी रात्री बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा दिशेनं पाऊल टाकण्याच्या दृष्टीने चर्चा, झाल्याची माहिती देण्यात आली.

संध्याकाळी फारुख अब्दुला आणि चंद्राबाबू नायडू शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी प्रफुल्ल पटेल सुद्धा हजर होते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यबाबत चर्चा झाली.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितले की, ‘आजच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे’, असा निर्णय झाला. तसेच, ‘भाजप विरोधी राजकीय पक्षांना समाविष्ट करण्याकडे आमचा भर राहणार आहे’, असे पवार यांनी सांगितले.