अपहरणाच्या गुन्ह्यात फरार आरोपीला तीन वर्षांनी अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. ही कावाई गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि.१४) अप्पर इंदिरानगर येथील राममंदीराजवळ करण्यात आली. कार्तीक उर्फ काळू दिवटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी कार्तीक दिवटे याने २०१५ मध्ये लग्नासाठी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. गुन्हा केल्यानंतर दिवटे फरार झाला होता. पुणे पोलीस आयुक्तालयातील फरार आरोपींचा शोध घेत असताना दरोडा प्रतिबंधक विबागाचे पथक बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दिवटे हा अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळ आला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. पोलसांनी या ठिकाणी सापळा रचून दिवटे याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.  दिवटे याच्यावर अल्पवयीन मुलचे अपहरण केल्याचा खडक पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, महिला सहायक पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, विल्सन डिसोझा, शंकर पाटील, सचिन गायकवाड, योगेश जगताप यांच्या पथकाने केली.