पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई निगडी येथील त्रिवेणीनगर चौकात बुधवारी (दि.१६) करण्यात आली. अविनाश भीमशा शिंगे (वय 20, रा. मिलिंगनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक वाकड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली की, एक तरुण दुचाकीवरून त्रिवेणीनगर चौकात येणार आहे. त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल आहे. यानुसार त्रिवेणीनगर परिसरात सापळा रचून आरोपी अविनाश याला मोपेड दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेच्या डाव्या बाजूला देशी बनावटीचे पिस्तूल खोचलेले आढळून आले. त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपी विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण दळे, जमीर तांबोळी, फारूख मुल्ला, लक्ष्मण आढारी, नितीन बहिरट, मोहम्मद गौस नदाफ, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.