रुसूबाई रुसू आलिया भट्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आलिया आणि रणबीर कपूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या फोटोत आलिया अगदी कोपऱ्यात तोंड पाडून बसलीये तर रणबीर मस्त मोबाईल बघतोय. मग आलिया शूट करून दमलीये का ? नाहीतर रणबीर मोबाईल मध्ये बघतोय म्हणून त्याच्यावर रुसून बसलियेका कोणास ठाऊक. या फोटोत रुसलेली आलिया खूप क्युट दिसतीये. आणि रणबीरचं  तिच्याकडे लक्षच नाहीये.

हा फोटो ब्रह्मास्त्र च्या सेट वरचा आहे. ब्रह्मास्त्र या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरु आहे. रणवीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच या सिनेमातून चाहत्यांसमोर येतीये.  ब्रम्हास्त्र सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरुये यात तगडी स्टारकास्ट असल्यामुळे. हा सिनेमा बॉक्स ऑफीस वर रेकॉर्ड ब्रेक कमाई  करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येतीये. अमिताभ बच्चन, साऊथचा सुपरस्टार नागार्जुन, डिंपल कपाडिया, मोनी रॉय  यांसारखी मोठी स्टारकास्ट ब्रम्हास्त्र मध्ये आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीझ होतोय. अयान मुखर्जी या सिनेमाचा डायरेक्टर आहे तर कारण जोहर ने हा सिनेमा प्रोड्युस करतोय.

आलिया आणि रणबीर यांचं रिलेशनशिप म्हणजे बॉलीवूडकरांसाठी एक चटपटीत विषयच आहे. आलिया आणि रणबीरला अनेक ठिकाणी एकञ  स्पॉट केलं गेलय. आणि दोघांच्याही नात्यावर दोघांच्या घरातील मंडळी जाम खुश असल्याचं बोललं जातंय. रणबीर कपूरच्या फॅमिली गेट टु गेदर मध्ये अनेकदा आलिया दिसलीये. म्हणजेच दोघांनीही आपल्या नात्याला जगजाहीर केले नसले तरी ये पब्लिक हे भैय्या ये तो सब जाणती हे… बॉलीवूडला लग्नाचे डोहाळे लागलेत असं म्हंटल तरी चालेल… बॉलीवूड मध्ये सध्या जोरदार लग्नसराई चालू आहे.  आता दीपिका रणवीर पाठोपाठ पुढच्या वर्षी आलिया आणि रणबीरचा पण बँड बाजा  बारात वाजणार यात काही शंका नाही. नुकतेच रणबीरच्या एक्सगर्लफ्रेंड म्हणजेच दीपिकाचा लग्न झालं. मुंबई मध्ये दीप वीरू रिसेप्शन पार्टी देखील देणारेत मग हे दोघेही रणबीरला आमंत्रित करतील का हेपण बघण्यासारखं असणारे.