प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून विष प्राशन केलेल्या ‘त्या’ पोलीसाचा अखेर मृत्यू

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाईन
प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून विष प्राशन केलेल्या पोलीस नाईकची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. मागील सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या पोलीस नाईकचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज (शनिवारी) पहाटे मृत्यू झाला. सुनिल शामराव पाटील (वय-२४ रा. जवाहरनगर चौक, कोल्हापूर) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f97b45de-c3e6-11e8-b518-d364e173c9ff’]
सुनिल पाटील यांनी प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून विष प्राशन केले होते. पाटील हे इचलकरंजी-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असून हजेरी मास्तरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २४ सप्टेंबरला दुपारी ते शास्त्रीनगर येथील बुद्धगार्डनमध्ये बेशुद्धावस्थेत नागरिकांना मिळून आले होते. शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
[amazon_link asins=’B01NCN4ICO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a97014e-c3e7-11e8-a422-f35b428baa97′]
महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या त्रासाला की कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, याची चौकशी राजारामपुरी पोलीस करीत आहेत. ते यापूर्वी लक्ष्मीपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात काम करीत होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून नोकरीवर असताना तेथील दोन महिला कॉन्स्टेबलशी त्यांची मैत्री झाली. त्यातून त्यांचे दोघीसोबत प्रेमसंबध जुळले. त्या दोघींकडून त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जात होते, अशी पोलीस दलात चर्चा आहे. सुनिल पाटील यांचे वडील पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर ते अनुकंपाखाली पोलीस दलात भरती झाले. सुमारे चौदा वर्ष त्यांची सेवा झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
दोन्ही महिला कॉन्स्टेल त्याच्या घरी व पोलीस ठाण्यात येवून सुनील पाटील यांना धमक्या देत होत्या. तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तुझे आयुष्य रस्त्यावर आणीन अशा धमक्या वारंवार दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस दलात आहे.
जाहिरात