हजारोंच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला अटकेत 

कोंढवा : पोलीसनामा ऑनलाईन – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिचे नाव रुख्मिणी चंद्रकांत सुरणर आहे. लक्ष्मीनगर लेन. न. 7 कोंढवा या भागातील महिला संशयित म्हणून अटक झाली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. ९२००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तिच्याकडून जप्त करण्यात आले असून कलम  ३८१ अनवये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इक्बाल शेख, पोलीस नाईक सुरेंद्र कोळगे, योगेश कुंभार, निलेश वणवे, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी केली आहे.