पैश्याच्या वादातून अपहरण करूण मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – उसने पैश्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार नुकताच आळंदी रोड, दिघी येथे घडली. या प्रकरणी सुरेंद्र उत्तम वाघ (३४, रा. मल्हार हाईट्‌स, देवाची आळंदी, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर लोकेश कुळे आणि तीन अनोळखी व्यक्‍ती (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र आणि त्यांचा मित्र किरण शिंदे हे दोघेजण श्रेयस हॉटेल, आळंदी रोड, दिघी येथे १४ जानेवारी रोजी आठ वाजताच्या सुमारास उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी लोकेश आणि त्याच्या साथीदारांनी वाघ तसेच शिंदे यांना उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. तपास पोलीस करीत आहेत.