अटक न करण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यामध्ये मदत करणाऱ्यासाठी आणि अटक न करण्यासाठी मदत करावी, यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस बीट अंमलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस बीट अंमलदार मंडळे (गोंदी पोलीस स्टेशन, जि. जालना) असे त्यांचे नाव आहे.

तक्रारदार ज्या गावात राहतात. त्या गावाला पोलीस बीट अंमलदार म्हणून मंडाळे काम पहातात. तक्रारदार व त्यांच्या मुलाविरोधात गोंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास मंडाळे यांच्याकडे आहे. या गुन्ह्याबाबत तक्रारदार मंडाले यांना जाऊन भेटले असताना त्यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी, अटक न करण्यासाठी, विनाकारण मारहाण न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तसेच पैसे न दिल्यास जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिली होती.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची ३ डिसेंबरला गुंडेवाडी ते गोंदी रोड येथे जाऊन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान पंचासमक्ष मंडाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली व तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर १० डिसेंबर रोजी गोंदी पोलीस ठाण्यात लाचेचा सापळा लावण्यात आला. परंतु, मंडळे यांनी लाच स्वीकारली नाही. याबाबतचा सविस्तर अहवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांना पाठविण्यात आला. त्यांनी या अहवालावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मंडाळे यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी लाच मागितल्याचे पंचासमक्ष रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. पंच साक्षीदार असल्याने त्यांच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक रवींद्र डी, निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण  तसेच कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, संतोष धावडे, संजय उदगीस्कर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रविण खंदारे यांनी ही कार्यवाही पार पाडली.