ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अधीक्षकांनी ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात अवैध धंद्यावर धाडी टाकून १६३ आरोपींवर कारवाई करुन ४ कोटी ४४ लाख १० हजार २९४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.पथकाने जिल्ह्यातील दारु, जुगार, मटका व वाळू आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर २0१८ दरम्यान सर्व तालुक्यातील अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली होती. अवैध दारू विक्री प्रकरणी बार्शी तालुक्यात २, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, कुर्डूवाडी-२, सोलापूर तालुका पोलीस ठाणे-२, टेंभुर्णी-२, कामती-१, माळशिरस-१ अशा एकूण ११ कारवाया करण्यात आल्या.

मटका व जुगार प्रकरणी तालुका पोलीस-१, मंद्रुप-१, बार्शी शहर-२, मोहोळ-१, वैराग-१. अवैध जुगार प्रकरणी अक्कलकोट उत्तर-२, सोलापूर तालुका-२, नातेपुते-२, टेंभुर्णी-१, वैराग-१. अवैध वाळू उपसा व विक्री प्रकरणी टेंभुर्णी-१, सोलापूर तालुका पोलीस ठाणे-१, माढा-१, अक्कलकोट दक्षिण-२, पांगरी-१, पंढरपूर तालुका-१, वळसंग-१ अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेगाव येथे तहसीलदार अक्कलकोट यांना भीमा नदी पात्रात अवैध उपसा करणारी बोट नष्ट करण्यास मदत केली आहे. कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेगमपूर येथील अवैध ओव्हरलोड वाहतुकीचा १ ट्रक व २ टिपर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असून जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे सुरु असल्यास नागरिकांनी पोलिसांना सांगावे. या अवैध व्यवसायावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

2 thoughts on “पोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई”

  1. खरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड करावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + four =