‘ते’ गाडे काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा…. 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सणांकरिता विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेले गाडे मात्र अजूनही शहरातील बऱ्याच ठिकाणी सार्वजनीक रस्त्यावर उभे केले गेले आहेत. या गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित मंडळांनी तसेच गाडा मालकांनी हे गाडे जर येत्या २४ तासात हटवले नाही तर पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते.

पुणे शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव आणि नवरात्र हे सण साजरे करण्यात आले. यादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून  मिरवणुकीकरिता गाडे वापरण्यात आले. सण होऊन महिना उलटला असला तरी अद्याप हे गाडे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभे केलेले दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा तर होतच आहे तसेच सार्वजनिक सफाई करण्याकरिता देखील अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित गाडा मालकांनी तसेच मंडळांनी येत्या २४ तासात हे गाडे हटवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

हे गाडे हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा पवित्रा पालिकेकडून घेण्यात येत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभाग पुणे शहर यांच्यामार्फत गाडा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच हे गाडे जेसिबी आणि गॅसकटरच्या साहाय्याने तोडून गाड्यांचे साहिताय जप्त करण्यात येईल असा इशारा पालिकेकडून करण्यात आला आहे.