‘हा ‘अभिनेता सध्या जेल मध्ये करत आहे कॉमेडी !

दिल्ली : वृत्तसंस्था: २०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चर्चेचं कारणही तसंच आहे चित्रपटात कॉमेडी केल्यानंतर राजपाल यादव हे सध्या  तिहाड जेल मध्ये कॉमेडी करून सगळ्या कैद्यांना हसवण्याचा काम करतआहे मिळालेल्या माहिती नुसार १४ डिसेंबर ला जेल मध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राजपाल यांनी कॉमेडी  ऍक्ट करून सगळ्यांचे मनोरंजन केले चेक बाउंस प्रकरणी  दिल्ली हायकोर्टाने त्यांना १ डिसेंबर रोजी ३ महिन्याची शिक्षा दिली होती. या प्रकरणी दिल्लीच्या ‘मुरली प्रोजेक्टस् कंपनी ‘ने राजपाल यांच्या ‘श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट’ कंपनीला पाच करोडच लोन दिलं होत
त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी हे पाच करोड रुपयांचं कर्ज घेतलं होत. हे  कर्ज फेडण्यासाठी ते असमर्थ ठरले याच कारणाने त्यांना जेल ची तीन महिन्यांची शिक्षा झाली आहे .२०१० च्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाद्वारे  ‘निर्देशक’ म्हणून पदार्पण केले होते राजपाल यादव यांनी मालामाल विकली ,खट्टा मिठ्ठा ,भूल भुलैय्या , ढोल ,छुपछुप के. यांसारख्या चित्रपटात विनोदी भूमिका साकारली आहे.