आईला व्हॉट्सअ‍ॅप करून ‘या’ अभिनेत्रीची आत्महत्या

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – तेलगू अभिनेत्री झांसी हिच्या आत्महत्येची बातमी ताजी असताना आता एका तमिळ अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मॅरी शीला जबरानी (याशिका) (Mary Sheela Jebarani) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तमिळ चित्रपट Mannar Vagaiyara मधील आपल्‍या दमदार अभियनामुळे याशिकाने लोकप्रियता मिळवली होती.

आईला व्हॉट्सअ‍ॅप करून आत्महत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या प्रेमप्रकरणातुन झाली असल्याचे बोलले जात आहे. याशिका एका हॉस्टेलमध्‍ये राहत होती. त्‍यावेळी तिची भेट अरविंद मोहनबाबू या तरुणाशी झाली. सुरुवातीला दोघे मित्र होते. परंतु, नंतर दोघांच्‍या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मोहन सेलफोन सर्विस सेंटरमध्‍ये काम करत होता. काही दिवसांनी, याशिका मोहनबाबू सोबत पीरावैल्लूरमध्‍ये शिफ्ट झाली. ती मोहनबाबूसोबत चार महिने लिव्‍ह इनमध्‍ये राहू लागली. दोघांमध्‍ये भांडण झाल्‍यानंतर मोहनबाबूने घर सोडले होते. याशिका आपल्‍या लव्‍ह लाईफविषयी चिंतेत होती. तिने आपला बॉयफ्रेंड मोहनबाबूला आपल्‍या आत्‍महत्‍येला जबाबदार असल्‍याचे म्‍हटले आहे. आत्‍महत्‍येपूर्वी याशिका आपल्‍या आईला व्‍हॉट्सॲपवर मॅसेज करून आपण आत्‍महत्‍या का करत आहोत, याचे कारण सांगितले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.