ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

अभिनेत्री शमिता शेट्टीला शिव्या तर ड्राइव्हरला जबर मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री शिल्पा शेट्टी ची बहीण शमिता शेट्टी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. एका घटनेत अभिनेत्री शमिता शेट्टीला तीन बाइकस्वारांकडून शिव्या देण्यात आल्या तर तिच्या ड्राइव्हरला जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील विवयाना मॉलजवळ घडली. या घटनेनंतर शमिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी शमिता शेट्टी ठाण्यातील विवयाना मॉल जवळून निघाली असताना तिच्या गाडीची आणि एका बाइकस्वाराची धडक झाली. या धडकेनंतर तीन बाइकस्वारांनी शमिताला शिव्या देत तिच्या ड्रॉयव्हरला जबर मारहाण केली एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील या तीन बाइकस्वारांनी दिली. त्यानंतर ते पसार झाले. या घटनेबाबत शमिताने रबोडी पुलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे.

त्यानंतर पोलिसांना त्या तीन बाइकस्वारांच्या बाईकची ओळख पटली आहे. याबाबत शमिताच्या ड्रॉयव्हरने पोलिसांना सांगितले की, त्या तीन व्हॅनचालकांनी त्याला मारले आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पोलिसांनी तिनही आरोपींच्या विरोधात कलम 279, 323, 504, 427 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपींची देखील ओळख पटली आहे.

दरम्यान, अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या चित्रपटाच्या दुनियेपासून लांबच आहे. काही दिवसांपूर्वी शमिता टीव्ही रिऍलिटी शो खतरों के खिलाड़ी सीजन 9 मध्ये सहभागी झाली होती. मोहब्बतें शिवाय जहर, कैश तसेच मोहब्बत हो गई है तुमसे या चित्रपटात शमिताने अभिनय केला आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button