रजनीकांत नंतर साऊथच्या ‘या’ सुपरस्टार सोबत दिसणार अक्षयकुमार

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा खिलाडीकुमार म्हणजेच अक्षयकुमार पुन्हा एकदा साऊथच्या चित्रपटात दिसून येणार आहे. रजनीकांत यांच्यासोबत ‘2.0’ मध्ये काम केल्यानंतर लवकरच अक्षय कुमार साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कमल हासन यांच्या‘इंडियन 2’ चित्रपटात अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट १९९४ मध्ये आलेल्या ‘इंडियन’चा सीक्वल आहे. ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हासन, मनिषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये कमल हासन मुख्यभूमिकेत दिसणार आहे. कालच दिग्दर्शक शंकर यांनी ‘इंडियन 2’चा फर्स्ट लूक रिलीज केले होते. ‘फिंगर क्रॉस’ केलेले कमल हासन या पहिल्या पोस्टरमध्य दिसले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याआधी चित्रपटासाठी अजय देवगणशी संपर्क केला होता. पण तारीख नसल्याने अजयने या चित्रपटास नकार दिला आणि ही भूमिका अक्षयला मिळाली. ‘इंडियन 2’ हा कमल हासन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याचे खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केले होते. उद्या १८ जानेवारीपासून ‘इंडियन 2’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा ‘2.0’ चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने चांगले बॉक्सऑफिस कलेक्शन केले होते. याचित्रपटाचे डायरेक्टर शंकर होते. आणि ‘इंडियन 2’चित्रपटाचे डायरेक्टरही शंकर असणार आहे. त्यामुळे या चित्रपटानिमित्त अक्षय दुसऱ्यांदा शंकरसोबत काम करणार आहे.