तब्बल दोन दिवसांनी कॅनॉलमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकास काढले पिता पुत्राने बाहेर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल दोन दिवसांपासून कॅनॉलच्या कठड्याचा आधार घेऊन थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्राण बच्चू सिंग व आझाद सिंग टाक या पिता पुत्राने वाचविले आहेत. सासवड रोडवरील कॅनॉलच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते दोन दिवसांपासून  अडकून बसले होते.

सासवड रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये गणपत विश्राम गोरीवले (वय ६०, राहणार मालाड) हे ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी गेले होते, दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढला दरम्यान पुलाखालील दगडी  कठड्याचा आधार घेऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. इतकेच नव्हे तर तब्बल दोन दिवसं पासून ते दगडी कठड्याचा आधार घेत तिथे उभे होते. इतकेच नव्हे तर तब्बल दोन दिवस पाण्यात असल्याने अर्धमेल्या अवस्थेत ते नागरिकांकडे  मदतीची याचना करत होते. दरम्यान तिथून जात असलेले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बच्चूसिंग टाक  तसेच आझाद सिंग टाक या पिता पुत्राला ते दिसले दरम्यान त्यांनी कॅनॉल मध्ये उडी मारून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

विशेष म्हणजे  मी कामाच्या शोधात गेली काही दिवस हडपसर परिसरात फिरत आहे. काही कामधंदा न मिळाल्यामुळे भिक्षा मागून मी माझा उदरनिर्वाह करतोय. इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी आपण कॅनॉलमध्ये उतरलेलो असताना अचानक पाण्याचा प्रवाह आला ज्यामुळे मी वाहत गेलो. आणि दगडांचा आधार घेऊन थांबलो. असे कॅनॉलमध्ये अडकलेले गणपत विश्राम गोरीवले (वय ६०, राहणार मालाड) यांनी म्हंटले.