‘या चित्रपटानंतर दिशा पुन्हा दिसणार सलमान सोबत

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी हिला सलमान सोबत पुन्हा एकदा चमकण्याची संधी मिळाली आहे. दिशा सध्या सलमान खानच्या भारत चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानच्या  ‘किक 2’.या चित्रपटात दिशा आणि सलमानची जोडी लवकरच दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी दिशाला साजिद नाडियाडवाला यांच्या ऑफिसात स्पॉट केले गेले होते. ही भेट ‘किक 2’संदर्भातचं होती, असे आता कळतेय. सूत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार या चित्रपटाचे शुटिंग या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरु होणार आहे. या चित्रपटातील दिशाच्या रोल विषयी तूर्तास काही माहिती मिळाली नसून  दिशाची भूमिकाही सलमानच्याच तोडीची असेल असे बोलले जात आहे.
सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात दिशाचा छोटा पण महत्वपूर्ण रोल आहे. सलमान सोबत दिशाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे  चित्रपटात काही स्टंट देखील ती करणार आहे. दिशा याआधी टायगर श्रॉफसोबत ‘बागी -2’या चित्रपट दिसली होती.  दिशाने  ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली तसेच जॅकी चॅनसह ‘कूंग फू योगा’या सिनेमातही ती दिसली होती.