महिलांवरील ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हार्दिकनंतर आता रणवीर सिंह ट्रोल

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – ‘कॉफी विथ करणमध्‍ये’ क्रिकेटर हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भलताच वाद होताना दिसून आला. यानंतर हार्दिक चांगलाच ट्रोलही झाला होता. अनेकांनी त्याच्यावर सोशल मीडियावरून सडकून टीका केली. हे प्रकरण हार्दिकच्या चांगलंच आंगलट आलं. कारण हा वाद नंतर बीसीसीआयपर्यंत पोहोचला आणि याचा परिणाम असा झाला की, ऑस्ट्रेलियात होणार्‍या वन डे सीरीजच्‍या सामन्‍यातून त्‍याला बाहेर करण्‍यात आले. ही घटना ताजी असतानाच आता रणवीर सिंहदेखी महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ट्राेल होताना दिसत आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्‍हिडिओत रणवीर महिलांवर आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करताना दिसत आहे. रणवीरच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांकडून चांगलीच टीका होताना दिसत आहे. कारण रणवीरचा हा व्हिडिओ ट्विटर युजर्सच्‍या निशाण्‍यावर आला असून तो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रणवीर सोबत अनुष्का शर्माची उपस्‍थिती दिसत आहे. त्याच्या वक्तव्यानंतर अनुष्‍का रणवीरला ओरडतानाही दिसतेय. आधी रणवीर करीनाबद्दल बोलतो आहे नंतर तो अनुष्काविषयीही बोलतो आहे असे या व्हिडिओत दिसत आहे.

आधी हार्दिक पांड्या नंतर आता रणवीरवर होणाऱ्या टीकेनंतर  ‘कॉफी विथ करण’ शोवरही टीका होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण या शोचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

https://twitter.com/PUNchayatiii/status/1083006803036626944