मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते तसेच शाळा, महाविद्यालये, सिमकार्ड खरेदी करिता आधार कार्ड जोडणे सक्तीचे नाही असा निर्णय दिला आहे. हा निर्णय येईपर्यंत कोणावरही आधारकार्डाकरिता सक्ती करु नये असे निर्देश दिले होते. मात्र असे असताना देखील एका बँकेने खाते उघडण्यास नकार दिल्यामुळे या बँकेविरोधात मुंबई उच्च न्ययालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आथिर्क मायक्रो फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अॅड. नियम भसीन यांच्यामार्फत नरिमन पॉइंट येथील येस बँक शाखेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या बँकेने खात उघडण्यास नकार दिल्याने आपल्या व्यवसायात खूप मोठा आर्थिक फटका बसला असून खूप मनस्तापही सहन कारावा लागला. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून बँकेला दहा लाख रुपये आपल्याला देण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d53a3ca-c187-11e8-836d-696dc0e477a6′]
बुधवारचा निर्णय जाहीर होण्या आधी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेले निर्देश स्पष्ट असतानाही ते पाळले गेले नाहीत. या निर्देशांची बँकेला लेखी स्वरुपात माहिती देऊनही बँकेने या पत्रव्यवहारास कोणतेही उत्तर न देता केराची टोपली दाखवली, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे.
[amazon_link asins=’B072JBHDTH,B076VKYVHQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b137f418-c187-11e8-a708-d1f94b3ca521′]