‘ठाकरे’ नंतर संजय राऊत करणार जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकची निर्मिती

मुंबई : वृत्तसंस्था – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत अजून एका बायोपिकची निर्मिती करणार असल्याची चर्चा होत आहे. हा बायोपिक दिवंगत राजकीय नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर बनणार आहे. अल्झायमरच्या आजारामुळं गेली दहा वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचं सोमवारी निधन झालं होत.

चित्रपटाची कथा १९५० च्या मध्यापासून तर १९७५ पर्यंत जॉर्ज यांनी मुंबईत घालवलेल्या कालखंडावर आधारित असेल, असेही सांगितले जातेय.’ठाकरे’ चित्रपटाप्रमाणे हा बायोपिकही हिंदी व मराठी अशा दोन भाषांत तयार होईल.

येत्या मार्चपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल ,असेही वृत्तसमोर आले आहे.‘पीकू’ व ‘अक्टूबर’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे अशी संजय राऊत यांची इच्छा आहे.याबाबत माझी त्याच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काहीही फायनल झालेलं नाही,’ असं राऊत म्हणाले.

मध्यंतरी जॉर्ज यांच्या पत्नी लैला फर्नांडिस यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून या बायोपिकला विरोध दर्शवला होता. मी आणि माझा मुलगा या बायोपिकच्या कल्पेनेसंदर्भात साशंक आहोत. कुटुंबाच्या परवानगीशिवाय हे बायोपिक साकारता कामा नये, असे त्यांनी म्हटले होते.