प्रदेशाध्यक्षांसमोर राष्ट्रवादी भवनात गदारोळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाला पाठिंबा दिल्याप्रकरणी हकालपट्टी केलेले 18 नगरसेवक आज दुपारी राष्ट्रवादी भवनात येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांसमोरच गोंधळ घालून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी भवनात चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र तणाव कायम आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज दुपारी नगर मध्ये आले आहे. ते पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेत असतानाच भाजपाला पाठिंबा दिल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी केलेले 18 नगरसेवक तेथे आले. हकालपट्टी झालेले नगरसेवक येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड सुरू करून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे आलेलो आहोत, असे नगरसेवक सांगू लागले. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातून एकच गोंधळून हकालपट्टी झालेले नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. या प्रकारामुळे राष्ट्रवादी भवनात चांगलाच गोंधळ उडाला. अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हकालपट्टी झालेल्या नगरसेवकांना एका खोलीत जाण्यास सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील हे सदर खोलीत जाऊन बडतर्फ नगरसेवकांशी चर्चा करू लागले