मनोरंजन

‘मणि’च्या चित्रपटात दिसणार ‘ऐश्वर्या राय बच्चन’

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच साऊथ चा सुपरस्टार विक्रमसोबत काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या सिनेमात दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मणिरत्नम या सिनेमावर काम करत आहेत. या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर ऐश्वर्या दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. ऐश्वर्या बरोबर अभिनेता विक्रम या चित्रपटात असणार आहे. असे बोलले जात आहे.

मणिरत्नम, कृष्णमूर्ती कल्कि यांची कादंबरी पोन्नियन सेलवनवर काम करत होते. ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी कृष्णमूर्ती यांना तीन वर्षांचा कालावधी लागला होता तामिळ इतिहासातील एका महान राजाची कहाणी या चित्रपटातून दिसणार आहे. ऐश्वर्या आणि विक्रमसह या सिनेमात विजय सेतुपति, सिम्बु यांच्यादेखील भूमिका असणार आहेत. १४ जानेवारी म्हणजेच ‘पोंगल’च्या दिवशी मणिरत्नम् या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

या सिनेमाशिवाय ऐश्वर्या अनुराग कश्यप निर्मिती गुलाब जामून सिनेमात देखील दिसणार असल्याची शक्यता आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. या दोघांनी ‘गुरू’, ‘उमराव जान’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘रावण’ व ‘सरकार राज’ सारख्या सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या